काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी नुकतेच अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचे वक्तव्य केले आहे. खरंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील अनेक दिवस अजित पवार व मुख्यमंत्रीपद ( Chief Minister) ही चर्चा सुरू आहे. एवढंच नाही तर स्वतः अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्री व्हायची इच्छा बोलून दाखवली आहे. दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आता साकडे देखील घालण्यात आले आहे. ( Ajit Pawar as chief minister)
Ajit Pawar: बारसू रिफायनरीबाबत अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे लोक विरोध करत…”
अजित पवार ( Ajit Pawar) भाजपसोबत जाणार आहेत व त्यांना राष्ट्रवादीच्या ( NCP) काही आमदारांचा पाठिंबा सुद्धा आहे. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या चर्चा इथंच थांबल्या नाहीत तर अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. अशा अफवा सुद्धा पसरल्या होत्या. परंतु, खुद्द अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा मात्र आजही कायम आहे.
“आम्हाला पैसे नको जमिनी द्या…” रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध!
या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या सासुरवाडीमध्ये देवाला साकडे घालण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तेरई गाव अजित पवारांचे सासर आहे. येथील ग्रामस्थांनी संत गोरोबाकडे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडे घातले आहे. यावेळी तेरई गावातील लोकांनी संत गोरोबाची विधीवत पूजा केली आहे.
Riya Chakravarti: रिया चक्रवर्ती बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा वाचाच