Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar | अजित पवार म्हणाले, “तो विषय संपला! महाविकास आघाडीला… “

Ajit Pawar Ajit Pawar said, "That matter is over! Mahavikas Aghadi..."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी जाहीर केलेला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी आपला राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्या विनंतीला मान देत, पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र अजित पवार (Ajit Pawar) या पत्रकार परिषदेत उपस्थित न्हवते. यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले होते.

Rakhi Sawant | अखेर राखी सावंतला मिळाला तिचा शहजादा! दुबई मध्ये गेली आणि…

परंतु, अजूनही अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, काल शरद पवार तुमच्या सोबत बोलले आहेत. त्यांनी जे सांगायचं ते सांगितले आहे. जे त्यांचे मत आहे तेच आमचे मत आहे. त्यांनी निर्णय घेतला तो सर्वांना सांगितला त्यामुळे सगळेच समाधानी आहेत. साहेबांनी कार्यकर्त्यांच्या, पक्षातील नेत्यांच्या आणि सर्व लोकांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा निर्णय मागे घेतला.

Cotton Rates । पांढऱ्या सोन्याने केलीय शेतकऱ्यांची कोंडी; कापसाचे दर अजूनही कमीच!

आम्ही सगळे पुन्हा कामाला लागलो आहोत. राजीनाम्याचा विषय आता संपला आहे. महाविकास आघाडीला सुद्धा कसलाच धक्का लागणार नाही. आम्ही एकत्र होतो आणि एकत्र आहोत. असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान काल ( ता.६) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damaniya) यांनी अजित पवारांबाबत मोठे विधान केले आहे. ” अजित पवार शांत बसणाऱ्यातले नाहीत. ते लवकरच दगाफटका करतील. ” असे त्या म्हणाल्या आहेत.

Viral Video । लग्न चालू असतानाच अचानक घडला एकदम धक्कादायक प्रकार; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version