Ajit Pawar । काल बुधवारी विधानसभा निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. यामध्येच बारामती विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली आहे. मात्र या सर्वांमध्ये आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सकाळ वृत्तसंस्थेचा एक्झिट पोल हाती आला असून बारामतीत कोणता संभाव्य आमदार असणार आहे. याची माहिती समोर आली आहे.
बारामती मध्ये पुन्हा एकदा अजित पवार निवडून येणार असल्याची चिन्ह आहेत. अजित पवार यांना त्यांचा सख्या पुतण्या युगेंद्र पवार यांच आव्हान आहे. मात्र सकाळ वृत्तसंस्थेच्या एक्झिट पोलनुसार अजित पवार आमदार होऊ शकतात.
Baramati news । बारामतीत मतदानावर गदारोळ, शर्मिला पवारांचा गंभीर आरोप, युगेंद्र पवार संतापले
गेल्या 35 वर्षापासून बारामती मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे आहे मात्र त्यावेळी राष्ट्रवादी एकसंध पक्ष होता मात्र आता शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये फूट पडली असून अजित पवार यांनी बारामती मधील प्रत्येक भाग पिंजून काढला आणि यावेळी मतदार आपल्या बाजूने उभे राहतील याची खात्री करून घेतली. त्यामुळे सध्या तरी अजित पवार यांचे पारड जड असल्याचे चित्र दिसत आहे.
Eknath Shinde | मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार