Ajit Pawar । मुंबई : मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्राची शपथ घेतली आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले असली तरी ते लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसापासून सुरू आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. दरम्यान नुकताच अजित पवार यांचा वाढदिवस झाला आहे तर त्यांच्या वाढदिवसादिवशी देखील बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला गेलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
या चर्चा चालू असतानाच आता राज्यातील एक महत्त्वाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी देखील अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.धर्मरावबाबा अत्राम यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठे भाष्य केले आहे.
Ajit Pawar । आमदारांच्या निधी वाटपात ‘दादा’गिरी? अजित पवारांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…
याबाबत बोलताना ते म्हणाले, “भविष्यात अजित पवार हे मुख्यमंत्री व्हायला हवे अशी आमची भावना आहे. त्यामुळे ते लवकरच मुख्यमंत्री होतील असे आम्हाला वाटते. मात्र सध्याचे सरकारही चांगलं काम करत आहे असं धर्मरावबाबा अत्राम हे म्हणाले आहेत”.
Adani Group । ब्रेकिंग न्यूज! गौतम अदानींनी विकली 1,600 कोटींची कंपनी
त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे अजित दादांच्या मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केल्याने पडद्यामागे नेमके काय चाललंय? अजित दादांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी ही वातावरण तयार निर्मिती तर नाही ना? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Mumbai Pune Expressway । पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर कोसळली दरड, वाहतुकीवर झाला खूप मोठा परिणाम