Ajit Pawar । राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काय ट्विस्ट येईल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाहीत. मागच्या काही दिवसापासून अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू होत्या. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू असे वक्तव्य केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आता फडणवीस यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे नेते जोरात देताना दिसत आहेत.
Bus Accident News । ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात! १ जणाचा जागीच मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रस्ताव प्रशासन मंत्री धर्मरावबाबा यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा अर्थच उलगडून सांगितला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांशी बोलताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, पाच वर्षाकरिता होईल की आणखी काय होईल हे माहीत नाही मात्र अजित दादाच मुख्यमंत्री होणार आहेत. लवकरच ते मुख्यमंत्री होतील. असा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
Sikkim Rain News । सिक्कीममध्ये निसर्गाचा कहर, ढगफुटीमुळे मोठा पूर; लष्कराचे 23 जवान बेपत्ता
अजितदादा पुढच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होणार काय? असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला यावर उत्तर देते म्हणाले तसं काही नाही केव्हाही होतील राजकारण काही सांगून येत नाही असं ते म्हणाले आहेत त्यामुळे सगळीकडे त्यांच्या वक्तव्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.