Ajit Pawar । अजित पवारांनी आपलेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा घेतला चांगलाच समाचार

Ajit Pawar And Shrinivas Pawar

Ajit Pawar । सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून सगळीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी सर्वांचे लक्ष हे बारामती मतदार संघाकडे लागले आहे कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. यामुळे सगळ्यांचे बारामती मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, बारामतीमध्ये सूनेत्रा पवारांच्या विरोधात, अजित पवारांचे भाऊ सुद्धा प्रचार करत आहेत. त्यावरुन अजित पवार आता चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray । राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, ‘निवडणूक लढवणार नाही’

श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचार केल्याने अजित पवार यांनी श्रीनिवास यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावंडं आता गरागरा फिरत आहेत. मी तोंड उघडलं तर फिरता येणार नाही, असा थेट इशाराच अजित पवारांनी दिला आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपलेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा अजित पवारांनी जळजळीत समाचार घेतला आहे.

Raj Thackeray । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे उगवलेत अशी टीका करतानाच तोंड उघडलं तर फिरता येणार नाही, असा थेट इशारा अजित दादांनी श्रीनिवास पाटलांना दिला आहे. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. मात्र मागच्या काही दिवसापूर्वी श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर आपण संकटाच्या काळात आपले काका म्हणजेच शरद पवार यांना एकट सोडणार नसल्याचे देखील श्रीनिवास पवार म्हणाले होते.

Gudipadwa । गुढीपाडव्याला गालबोट! एकाला वाचवायला गेले अन् 4 कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

Spread the love