Ajit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. त्याचबरोबर शरद पवारांची अनेक जण साथ सोडत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सांगलीतील शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील यांना हादरा बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सांगलीतील जयंत पाटील यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी झाल्या आहेत.
Chandrakant Patil । मोठी बातमी! विद्यार्थ्यांनी पुण्यात अडवली चंद्रकांत पाटील यांची गाडी
अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या जवळच्या असलेल्या काही माजी नगरसेवकांना आपल्या गटात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती मिळत आहे. या नगरसेवकांनी अजित पवार यांची बुधवारी सायंकाळी मुंबईमध्ये भेट घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच जयंत पाटील गटाचे हे माजी नगरसेवक अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
Earthquake । ब्रेकिंग न्यूज! दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के; पहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने तसेच भाजप नेते सुरेश आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी मुंबईमध्ये ही भेट झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे उपस्थित होते.
Ajit Pawar । ब्रेकिंग! बड्या महिला मंत्र्याचे अजित पवारांवर सर्वात गंभीर आरोप; चर्चांना उधाण