Ajit Pawar । राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बारामतीची प्रतिष्ठा आणि महत्वामुळे येथे कोणतीही निवडणूक विशेष चर्चेत येते. या निवडणुकीत अजित पवार बारामतीत निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला जनतेने निवडून द्या,” ज्यामुळे त्यांचा बारामतीत लढण्याचा विचार नाही असे संकेत मिळाले आहेत.
Bjp । भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात केला प्रवेश
सूत्रांनुसार, अजित पवार यंदा बारामतीच्या ऐवजी शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहेत. शिरूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ऐतिहासिक बालेकिल्ला आहे, त्यामुळे या मतदारसंघातून लढणे अजित पवारांसाठी महत्त्वाचे ठरू शकते. या बदलामुळे बारामती मतदारसंघातील राजकीय वातावरणात चुरशीचा सूर लागला आहे, आणि अनेकांना त्यांच्या पुढच्या रणनीतीची उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. यामुळे भाजप आणि इतर पक्षांकडून उमेदवारांच्या निवडीसाठी तयारी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे, त्यामुळे अजित पवार या निवडणुकीत किती प्रभावी भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. यामुळे बारामती आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघांतील राजकारण अधिक चुरशीचे होणार आहे.