Site icon e लोकहित | Marathi News

Ajit pawar । “अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, पण…” बड्या नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

Ajit Pawar

Ajit pawar । निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Loksabaha election date) जाहीर केल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) रणशिंग फुंकले आहे. ते सतत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करत आहे.

Viral Video । ऋषिकेशमध्ये प्री-वेडिंग शूट करणं जोडप्याला पडलं महागात… घडलं भयानक, पाहा Video

विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे. अजित पवार यांच्याविरोधात उमेदवारी घोषित केल्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात तिढा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी शिवतारे यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान आता या टीकेला शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Shiv Sena UBT Candidates List । ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंनी 17 उमेदवारांची नावे निश्चित केली; पाहा यादी

काय म्हणाले शिवतारे?

मी जरी उमेदवार नसलो तरीदेखील बारामतीत अजित पवार निश्चित पडणार आहेत. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, आपण युतीमध्ये आहोत. त्यांचं जे काही होईल ते आपसात होईल, त्यामध्ये आपण पडायला नको. ज्याच्या त्याच्या कर्माने तो मरेल, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला, असं मुख्यमंत्री म्हणाले, असं शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सांगितलं आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले.

Crime News । धक्कादायक बातमी! शालेय विद्यार्थिनीने संपवले जीवन

Spread the love
Exit mobile version