Ajit Pawar । ‘अजित पवार शांत बसणार नाहीत, दिवाळीत पुन्हा राजकीय भूकंप येणार’, अंजली दमानियांचा मोठा दावा

Ajit Pawar. 'Ajit Pawar will not sit still, there will be another political earthquake in Diwali', claims Anjali Damania

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याबाबत त्यांनी स्वतः स्पष्टीकरण देऊन देखील या चर्चा अजूनही थांबल्या नाहीत. अंजली दमानिया यांनी अजित पवारांबाबत केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान शरद पवारांच्या ( Sharad Pawar) राजीनाम्या नाट्याला सुद्धा यासोबत जोडले गेले आहे. शरद पवारांनी अजित पवारांबाबत सुरू असणाऱ्या चर्चा आणि संभाव्य पक्षप्रवेश थांबवण्यासाठी हा डाव टाकला होता असे म्हंटले जात आहे.

Katrina Kaif & Vickey Kaushal । कतरिना कैफ आणि विकी कौशल बेबी प्लॅनिंगच्या तयारीत पण ‘ही’ अट पूर्ण केल्याशिवाय…

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damaniya) यांना विचारण्यात आले असता त्यांनी मोठे विधान केले आहे. पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य करत त्या म्हणाल्या की, ” अजित पवारांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. अजित पवार हे शांत बसणाऱ्यातले नाहीत. दिवाळीपर्यंत ते परत आमदारांची जमवा जमव करून मोठा दगाफटका करतील.”

Rishabh Pant । ऋषभ पंतचे कृत्य पाहून चाहते झाले खुश; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

अंजली दमानिया यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेससोबत दगा फटका करतील का ? मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत हातमिळवणी करतील का ? अशा शंका अजित पवारांच्या भूमिकेबाबत निर्माण होत आहेत.

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल समोर आली मोठी अपडेट; निर्मात्याने थेट कोर्टात…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *