
Ajit Pawar । महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित दादा गट) यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक झाली तर 27 फेब्रुवारीला मतदान आणि 29 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. (rajya sabha election 2024)
यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीचे तीन वर्ष बाकी आहेत. त्यानंतर देखील त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी होती. मात्र प्रफुल्ल पटेल यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभा खासदारकी २०२७ पर्यंत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर राज्यसभेत प्रफुल्ल पटेल एकमेव खासदार आहेत.
अजित पवार यांची मोठी खेळी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून त्यांची राज्यसभा खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचा निकाल जर आला तर प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द होणार आहे. यामुळे प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याची खेळी अजित पवार यांनी घेतली. मात्र तांत्रिक कारणामुळे पटेल यांना उमेदवारी दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख असून प्रफुल्ल पटेल हे आज अर्ज भरणार आहेत. त्यासाठी पटेल खासदारकीचा राजीनामा आज देणार आहेत. त्यानंतर दुपारी १२:३० वाजता प्रफुल्ल पटेल उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.
Milind Deora । मिलिंद देवरा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले सर्वात मोठे गिफ्ट!