Ajit Pawar । पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महिलांमध्ये उत्साह दिसतोय, काल पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि त्यांना आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले .
Supriya Sule । सुप्रिया सुळेंवर सरकारी यंत्रणांची पाळत? शरद पवार यांच्या पक्षाचा धक्कादायक दावा
अजित पवार यांनी महायुती सरकारच्या योजनांचा उल्लेख करत, गरीब आणि कष्टकरी महिलांसाठी चांगल्या योजना आणल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना वीजमाफी, तीन गॅस सिलिंडर, युवतींना प्रशिक्षण, आणि दुधाला दरवाढ अशा उपाययोजना घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Satara Accident News । साताऱ्यातील भीषण अपघातात बस आणि दुचाकी जळून खाक, तरुणाचा मृत्यू
महायुतीमध्ये कोणताही वाद नसल्याचे पवार यांनी सांगितले. मागे माझी प्रचंड बदनामी करण्यात आली. वेशभूषा, नाव बदलून जातो म्हणून. मी तर आव्हान दिलय, मी कुठे नाव बदलून गेलो. आई-वडिलांनी दिलेलं नाव सुंदर आहे, त्याचा मला अभिमान आहे,” असं पवार म्हणाले. त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणं टाळत, “आम्ही कामाची माणसं आहोत, विकास साधणारी माणसं आहोत, आरोप-प्रत्यारोपात रस नाही,” असं सांगून, त्यांच्या कामगिरीवर भर दिला.
Ladki Bahin Yojna । आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास झाली सुरवात!