Ajit Pawar । ओबीसी-मराठा संघर्षावर अजित पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “ज्याच्या तोंडात आरक्षणाचा घास…”

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय चांगलाच तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मराठा बांधव आता एकवटले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी देखील लावून धरली आहे. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या संघर्षावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच मोठे वक्तव्य केले आहे. (Latest Marathi News )

Maratha Reservation । मोठी बातमी! मराठा आरक्षण कामगार रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल, मनोज जरांगे पुढे काय करणार?

बीडच्या परळी या ठिकाणी राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं यावेळी या संघर्षावर बोलताना अजित पवार म्हणाले, “आम्ही सर्वजण एकोप्याने राज्यातल्या सर्व जाती आणि धर्मांना आपल्यासोबत पुढे कसं घेऊन जाता येईल ते पाहतोय. महाराष्ट्रामध्ये जाती जातींच्या वेगळ्या मागणी आहेत. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे. धनगर समाज, आदिवासी समाज, ओबीसी समाजाच्या देखील अनेक मागणी असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

Dinesh Phadnis । मनोरंजनसृष्टीवर शोककळा! ‘सीआयडी’ फेम अभिनेत्याचं निधन

त्याचबरोबर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “तुम्ही तुमच्या मागण्यात जरूर मांडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हा अधिकार दिला आहे. त्याचबरोबर ज्यांच्या तोंडात आरक्षणाचा घास घातलाय त्यांना धक्का न लावता इतरांनाही आरक्षण देण्याची भूमिका महायुती सरकारची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि मंत्रिमंडळातील आम्हा सर्व सहकाऱ्यांची तीच भूमिका आहे”. असे अजित पवार म्हणाले आहेत.

Crime News । हृदयद्रावक घटना! नवऱ्यानेच केली बायकोची हत्या, मृतदेह ड्रममध्ये भरून जंगलात फेकले

Spread the love