Ajit Pawar । अजित पवारांची कबुली; शरद पवारांना सोडणं मोठी चूक होती

Sharad Pawar And Ajit Pawar

Ajit Pawar । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या धक्कादायक उलथापालथी झाल्यानंतर अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण कबुली दिली आहे. अजित पवारांनी शरद पवारांचा हात सोडून महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात तणाव निर्माण झाला. अजित पवारांनी या निर्णयावर जाहीरपणे भाष्य केले असून, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या जन सन्मान यात्रेदरम्यान हे विधान केले.

Ajit Pawar । अजित पवार गटाला किती जागा हव्यात? छगन भुजबळांनी थेट आकडाच सांगितला

अजित पवारांनी कबूल केले की, शरद पवारांना सोडण्याचा निर्णय हा त्यांच्या आयुष्यातील मोठी चुक होती. गडचिरोलीतील सभेत बोलताना त्यांनी म्हटलं की, “वडिलांचं प्रेम आपल्या लेकीवर असतं, तेवढंच प्रेम कुणीच करू शकत नाही. घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असताना हे उचित नाही. समाजाला हे आवडत नाही, आणि मी मान्य करतो की, ही माझी चूक होती.”

Ganpati Bappa Morya । गणेश चतुर्थीच्या उत्सवात गणरायाचे घराघरांत दणक्यात स्वागत!

सभेत अजित पवारांनी धर्माराव आत्राम यांच्या लेकीच्या दुसऱ्या पक्षात प्रवेशावर प्रतिक्रिया देताना, तेथील परिस्थितीवरही भाष्य केले. “तुम्ही बाबाच्या विरोधात उभे राहणार आहात हे शोभत नाही. एक डाव स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे, आणि तो डाव दाखवण्याची वेळ येऊ नये,” असे त्यांनी नमूद केले. या टिप्पणीने राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरु केली आहे.

Devendr Fadanvis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “अजितदादांसोबतची युती नॅचरल नाही”

अजित पवारांनी त्यांच्या योजनेच्या बाबतीतही माहिती दिली. त्यांनी जनतेसाठी चांगल्या योजनांची माहिती दिली आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिल्याची माहिती दिली. १८ वर्षांच्या मुलींना १ लाख रुपयांचे सहाय्य आणि ३ हजार रुपयांचे वाटप करण्याची योजना असून, अर्ज करण्याची कालमर्यादा वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले.

Harshwardhan Patil | इंदापूरच्या राजकारणात खळबळ; दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याने खळबळ, हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढलं

Spread the love