Ajit Pawar । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार सध्या जन सन्मान यात्रा काढत आहेत. राज्याच्या विविध भागांना भेटी देत आहेत. निवडणुकीआधी ते ग्राउंड रिॲलिटीला सामोरे जात आहेत आणि पक्ष मजबूत करण्यासाठी लोकांना भेटत आहेत. अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. दरम्यान, गुप्तचर विभागाच्या अहवालाने प्रशासनाची धांदल उडाली आहे.
गुप्तचर विभागाच्या (Intelligence Division) अहवालानुसार अजित पवार यांच्या जीवाला धोका आहे. गुप्तचर विभागाने त्यांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. जिथे महिलांची मोठी गर्दी असते तिथे जाऊ नका असे त्यांना सांगण्यात आले आहे. जीवाला धोका असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिथे जास्त महिला आणि गर्दी असते तिथे न जाण्याच्या सूचना मला देण्यात आल्या आहेत. असं अजित पवारांनी सांगितलं.
Bjp । ब्रेकिंग! भाजपकडून 288 विधानसभा जागांसाठी फॉर्म्युला निश्चित?; बैठकीत मोठा निर्णय
या दोन शहरात जाण्यात धोका
अजित पवार म्हणाले की, गुप्तचर विभागाने मला सांगितले आहे की, मी मालेगाव, धुळे सारख्या ठिकाणी गेलो तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, मात्र राज्यातील बहिणींनी मला राखी बांधली आहे. जोपर्यंत राख्या या हातावर आहेत, तोपर्यंत मला कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचे रक्षण आणि तुमच्या प्रेमाची ढाल मला कोणताही धोका स्पर्श करू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.
Supriya Sule । सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळेंचे फोन आणि व्हॉट्सॲप हॅक