Ajit Pawar । सध्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक नेते अर्ज भरत आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजित पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित पवार यांनी डमी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र सध्या याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अर्ज छाननीमध्ये अजित पवार यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे तर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
Sharad Pawar । पहाटेच्या शपथविधीच्या अजितदादांच्या विधानावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
माहितीनुसार, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाकडून उमेदवार असावा म्हणून डमी अर्ज भरण्याची परंपरा आहे. त्यानुसार अजितदादांनी देखील डमी अर्ज भरला होता. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे लागले आहे.
Viral । “आधी किस केलं अन् मग…”, दिल्ली मेट्रोत जोडप्याने केले एकदम अश्लील कृत्य; पाहा Video
सुप्रिया सुळेंचा अर्ज मंजूर
सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर शरद पवार गटाकडून डमी अर्ज भरलेल्या सचिन दोडकेचा अर्ज नामंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन दोडके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाने आज अर्ज छाननी केली असून दोडके यांचा अर्ज नामंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.