Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar | अजित पवारांचा मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध? बड्या नेत्याने दिली कबुली

Ajit Pawar

Ajit Pawar | सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी जालन्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभर आंदोलनाला सुरुवात केली आहे. (Politics News)

Ratan Tata । धक्कादायक! रश्मिका मंदाना, काजोलनंतर रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ झाला व्हायरल

मराठा आरक्षण सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील मराठा समाजाच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ महाराष्ट्रभर मेळावे घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. दरम्यान दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत.

Ranu Mandal Viral Video । लोकल ट्रेनमध्ये नाचणाऱ्या मुलीला रानू मंडलने झाडूने केली मारहाण, पाहा video

या सर्व घडामोडी घडत असतानाच आता प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केल आहे. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ आणि अजित पवार यांची भूमिका एकच असल्याचं बच्चू कडू यांनी वक्तव्य केल आहे. बच्चू कडू म्हणाले, “छगन भुजबळ वरिष्ठांच्या पाठिंब्याशिवाय बोलू शकत नाही. छगन भुजबळ आणि आणि अजित पवार यांची एकच भूमिका आहे हे यावरून स्पष्ट होते. असे ते म्हणाले आहेत”.

Viral Video । चालत्या फ्लाइटमध्ये मोठा गोंधळ, महिलेने तिची पॅन्ट खाली ओढली, म्हणाली; ‘मी इथेच लघवी करेन…’

Spread the love
Exit mobile version