कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाविरोधात गेले दोन दिवस झाले आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant) यांनी दिली असून काही महिलांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. परंतु तरीदेखील आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
“आम्हाला पैसे नको जमिनी द्या…” रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध!
या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जात असताना विधानसभा विरोधी पक्षनेत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार म्हणाले, “समृद्धी महामार्गाला देखील लोकांनी विरोध दर्शविला होता. पण चर्चा झाली त्यातून मार्ग निघाला. त्यामुळे जे लोक विरोध करत आहेत त्यांचं ऐकून घेत त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. अस अजित पवार म्हणाले आहेत.
भर पार्टीमध्ये सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने केलं असं कृत्य की सर्वजण पाहतच राहिले; पाहा Video
त्याचबरोबर “लोकांच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. एन्रॉन प्रकल्प आणताना देखील बऱ्याच जणांनी विरोध केला होता. या प्रकरणी मुस्कटदाबी होऊ नये. लोकांच्या संमतीने जे काही व्हायचं ते व्हायाला हवं. आम्ही विकासकामाला विरोध करत नाही”, असं म्हणत अजित पवारांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राजकीय वर्तुळात नवीन ट्विस्ट! मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आणखी एका नवीन नेत्याची वाढ…