Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना गंभीर इशारा; म्हणाले, ‘काहीही केलं तरी…’

Ajit Pawar

Ajit Pawar । सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जरांगेंनी केलेल्या वक्तव्यांचा अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनाही मोठा इशारा दिला आहे.

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलताना आपण भाषा सांभाळावी. आपण काहीही केलं तरी चालेल असे कोणीही समजू नये असा मोठा इशारा अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “मराठा आरक्षणाचा आतापर्यंत घेतलेला निर्णय टिकला नाही. मात्र आता आम्ही बारकाईने लक्ष घातलं आहे. बिहार राज्याप्रमाणे 10 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे 72 टक्के आरक्षण झालं आहे. तरीही काही वक्तव्ये केली जातात. असं अजित पवार म्हणाले आहेत.

Eknath Shinde । जरांगे यांच्याबद्दल भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “आता त्यांची…”

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलताना आपली भाषा सांभाळावी. कोणीही असं समजू नये की आपण काहीही केलं तरी चालेल. सगेसोयरे बाबत साडे सहा लाख हरकती आल्या आहेत. त्यावर सुद्धा काम सुरू आहे. मात्र सध्या जे घडतंय त्याच्या पाठीमागे कोण आहे? हे माहित करण्यासाठी खोलात जावं लागेल. असे धाडस कसे होते? असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

Maratha Reservation । ब्रेकिंग! महाराष्ट्राचे राजकारण तापले, फडणवीसांवर आरोप केल्यांनतर भाजप आमदाराचा जरांगेंना इशारा

Spread the love