Ajit Pawar । विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आज पावसातही त्यांनी रोड शो केला, ज्यात शेकडो समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले. रोड शो नंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी बारामतीकरांना संदेश दिला. त्यांनी म्हटलं की, “आता पुढच्या कामांचं नियंत्रण तुमच्या हातात आहे. बारामतीत विकासाच्या नवीन योजनांची सुरुवात होत आहे, आणि तुम्हीच ठरवणार आहात पुढचं काय करायचं आहे.”
Pune Crime । पुण्यात थरारक घटना! माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार
सभेत अजित पवारांनी बारामतीसाठी खास योजना जाहीर केल्या. “बारामतीस सर्वात जास्त विकासनिधी देण्यात आले आहेत आणि लवकरच येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरू होईल,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी भ्रष्टाचारावरील आरोपांना खंडन करत सांगितलं की, “महायुतीचे सरकार आलं तरी योजना सुरू राहतील. गरिबी भोगल्यामुळे आम्हाला प्रत्येक पैशाची किंमत माहीत आहे.”
महिलांवरील अत्याचारांवरही त्यांनी भाष्य करत, “बारामतीत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी. बारामतीतील मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. बारामतीची शिक्षणाची गुणवत्ता आणि पोलिसांवरील दबाव यावरून त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
Health Tips । ऍसिडिटीच्या त्रासापासून मिळवा सुटका! ‘या’ चार नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम