
Ajit Pawar । राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत भाजपला हटवण्याची विनंती देखील अजित पवारांनी समोर उपस्थित लोकांना केलेली दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र 2019 च्या निवडणुका दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.
Parbhani Accident News । स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अतिशय भीषण अपघात; पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
सध्या अजित पवार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणत आहेत की, “उद्याच्या मकर संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला मात्र या मोदीला हटवा. भाजपला बाजूला करा असं आवाहन अजित पवार करताना दिसत आहेत” यंदाच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर उलट उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करत त्यावर प्रतिउत्तर दिल आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे. याविषयी माहिती नसून तो 2019 च्या निवडणुकांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला परंतु या मोदीला हटवा = अजित पवार.
— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) January 14, 2024
मस्त शुभेच्छा दिल्या 🙏🏻🙏🏻🙏🏻pic.twitter.com/ZKM9mS7mdv