Ajit Pawar । सध्या हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरु आहे. अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध मुद्दयावरून घेरताना पाहायला मिळत आहे. हे अधिवेशन गाजलंय ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरून. जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक पहिल्यांदाच अधिवेशनात हजर झाले. इतकेच नाही तर ते सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. (Latest Marathi News)
Snoring Home Remedies । या 5 घरगुती उपायांनी, घोरण्याची समस्या कायमची दूर होईल, जाणून घ्या…
यावरून विरोधकांनी भाजपला (BJP) घेरले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहित मलिक सत्तेत सहभागी होण्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लिहण्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला एकनाथ शिंदेचा यांचा पाठींबा आहे. परंतु, महायुतीत अजित पवार एकटे पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Google ने Play Store वरून 17 फसवणूक कर्ज अॅप्स डिलीट केले, जाणून घ्या कोणते ते?
या पत्रावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीसांचे पत्र मला मिळालं आहे. ते मी वाचलं आहे. नवाब मलिक हे काल पहिल्यांदांच सभागृहात आले. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आले आहेत. त्यांची भूमिका काय आहे, ते ऐकल्यानंतर मी माझी भूमिका सांगेन, असे अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.”
Sambhajinagar News । वऱ्हाड म्हणून लग्नासाठी आले पाहुणे मात्र तेच निघाले पोलीस, नेमकं काय घडलं?