गेली 30 वर्ष पुण्यावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणजे गिरीश बापट. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट. यांनी वयाच्या 73 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.
‘आर्चीची’ भूमिका नाकारली आता पच्छाताप होतोय का? सायली पाटील म्हणाली…
गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आता यांनतर अजित पवार पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना पुणे पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. यासंदर्भात प्रश्न विचारले असता, अजित पवार चांगलेच संतापले आहेत.
राम नवमीच्या मुहूर्तावर प्रथमेश परबने चाहत्यांना दिली मोठी गुडन्यूज!
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, गिरीश बापट यांना जाऊन आज फक्त दोन दिवस झाले आहेत. म्हणून लगेचच कोणीही गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. असं म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले, ‘काही माणुसकी प्रकार आहे की नाही’ असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहे.
संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीच्या पोस्टने उडाली खळबळ! पाहा नेमकं काय म्हंटलय पोस्टमध्ये?