राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सरकारला नेहमीच घेरत असतात. दरम्यान, अजित पवार यांनी जालन्यातील (Jalna) एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सरकारवर जोदर टीका केली आहे. हजारो कोटी रुपयांचा खर्च करून सरकार जाहिरातबाजी करत असल्याची यावेळी त्यांनी टीका केली आहे.
कांदा प्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “कांद्याला किती खोके…”
अजित पवार यांनी राज्यसरकारच्या पेपरात येणाऱ्या जाहीरातीबद्दलदेखील टिका केल्याचं पहायला मिळालं आहे. राज्य सरकार जाहीरातीवर प्रचंड पैसा खर्च करत आहे. सणासुदीला एखादी जाहीरात आल्यास समजू शकतो. दररोज जाहिराती (Advertisements) देणं याचा अर्थ काय. याबाबतीत मी माझ्या एका अधिकारी मित्राला विचारलं तेव्हा तो म्हणाला की सरकार आल्यानंतर पदवीधर निवडणुका झाल्या त्यात आलेलं अपयशामुळे त्याचे डोळे उघडले आहेत. त्यामुळं जाहीरातीवर खर्च सुरु आहे. असा अनुभव अजित पवारांनी सांगितला.
“तुम्ही नाव चोरलं, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला, पण…”, उद्धव ठाकरे कडाडले
त्याचबरोबर अजित पवार यांनी सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेवरून देखील सरकारवर जोरदार टिका केली आहे. तुमचं कुटुंब या शिध्यावर चालून दाखवा. या शिध्यामध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो डाळ दिली जाते. याबाबतीत सरकारने चेष्टा चालवली आहे का? असा सवाल देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.