
Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांना दिल्लीतील कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने जप्त केलेली त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता आता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने या प्रकरणात निर्णय देत जप्त केलेली मालमत्ता मुक्त केली आहे, ज्यामुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Ajit Pawar । अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
आयकर विभागाने काही महिन्यांपूर्वी अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या मालमत्तेवर कारवाई केली होती. विशेषतः अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाई विरोधात पवार कुटुंबाने कोर्टात याचिका दाखल केली होती.
Eknath Shinde । अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर? शिंदे अॅक्टिव्ह मोडवर
2023 मध्ये झालेल्या या कारवाईसाठी पवार कुटुंबाने मालमत्ता जप्त करण्यात आलेली असल्याने स्थगितीची मागणी केली होती, ज्यावर कोर्टाने अंतिम निर्णय दिला. 5 डिसेंबर रोजी अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला. कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवार यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा थंडावा मिळाला असून, जप्त मालमत्तेची मुक्तता झाली आहे.
Cricketer Dies l ब्रेकिंग! क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू