
Ajit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केली आणि त्यानंतर भाजप सोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही नेत्यांनी अजित पवारांची साथ दिली तर काहींनी शरद पवारांची साथ दिली. मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आता श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) यांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार (Sharmila Pawar) या देखील अजित पवार यांच्या विरोधात गेल्या असून त्यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अजित दादांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Baramati Lok Sabha । अजितदादांची धक्कादायक बातमी; शिंदे गटानेही दर्शवला बारामतीत विरोध
शर्मिला पवार या श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत. त्याचबरोबर त्या शरयू फाउंडेशनच्या (Sharyu Foundation) अध्यक्षा देखील आहेत. शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत प्रचार देखील सुरू केला आहे. त्यांनी काल इंदापूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना मते द्या असं आवाहन देखील जनतेला केले आहे.
Vijay Shivatare । बारामतीत मोठ्या घडामोडी, विजय शिवतारे यांचं सर्वात मोठं विधान
त्याचबरोबर यावेळी त्यांनी विरोधाकांवर देखील सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही एकदम स्पष्ट भूमिका घेतली आहे. बारामती आणि इंदापूरच्या लोकांना ती सांगण्याची गरज नाही. विरोधकांना काहीच मुद्दे नाही त्यामुळे ते काही प्रचार करत आहेत. त्यांना दुसरा कामधंदा राहिलेला नाही अशी सडकून टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.