Ajit Pawar । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अनेक बडे नेते, कार्यकर्ते पक्षांतर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांचे विश्वासू संजोग वाघेरे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते लवकरच ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
संजोग वाघेरे माजी महापौर आणि माझी शहराध्यक्ष राहिले आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांचे जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघोरे उद्धव ठाकरेंच्या गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांना हा पिंपरीमध्ये मोठा धक्का मानला जातो.
माहितीनुसार, वाघोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, कुणाची भेट घ्यायची हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाही त्यामुळे आमच्याकडील लोकांना घेत असल्याची खोचक टीका देखील यावेळी अजित पवारांनी केले आहे.
Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिले ‘हे’ ओपन चॅलेंज