Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । ब्रेकिंग! अजितदादांचं ठरलं, विधानसभेला ‘इतक्या’ जागांवर लढणार

Ajit Pawar

Ajit Pawar । विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जागा वाटपाच्या देखील चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढवणार याचा आकडा स्पष्ट केला आहे. पवार यांनी सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांवर लढणार आहेच, पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचे आहे.

Harshvardhan Patil । राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका; हर्षवर्धन पाटलांचा गंभीर इशारा

मुंबईत काल संध्याकाळी झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पवारांनी हा आकडा जाहीर केला. या बैठकीत त्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची माहिती दिली. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी, नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर आणि अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके हे काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसच्या तीन आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

Sindhudurg News । छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी समोर आली मोठी अपडेट; चेतन पाटील यांना अटक

अजित पवार यांनी सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते देवेंद्र भुयार आणि राष्ट्रवादी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे देखील त्यांच्या गटात सामील होणार आहेत. यामुळे या नेत्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा अधिक सशक्त झाली आहे. प्रत्यक्षपणे या नेत्यांचा पक्षप्रवेश कधी होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही.

Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

राजकीय पातळीवर, अजित पवारांनी 60 जागा लढण्याचा दावा करताना, महायुतीच्या जागा वाटपात त्याचा स्वीकार होईल का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरीकडे, अजित पवार ‘जनसन्मान यात्रा’च्या माध्यमातून राज्यभरात प्रभावी प्रचार करत आहेत, ज्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते पूर्ण तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mumbai News | धक्कादायक! दहीहंडी उत्सवात मुंबई आणि ठाण्यात 238 गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर

Spread the love
Exit mobile version