नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Winter session 2022) सुरू आहे. यामुळे अधिवेशनात सुरू असलेल्या गोंधलाच्या चर्चा सध्या सर्वत्र होत आहेत. दरम्यान या अधिवेशनात अजित पवार सौम्य भूमिकेत पाहायला मिळाले. याकारणामुळे अजित पवारांवर काही आमदार नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अजित पवार ( Ajit Pawar) अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत नसल्याची तक्रार या आमदारांनी व्यक्त केली आहे.
राज्यामध्ये कोरोना निर्बंधाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…
राज्य विधिमंडळाच्या या अधिवेशनात विरोधक विविध प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र स्वतः विरोधी पक्षनेते ( Opposition Leader) आक्रमक भूमिका न घेता शांत असल्याने आमदार नाराज झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विषयावरून सरकारवर टीका करण्याचे ठरले असूनही अजित पवार शांत राहिल्याचा आरोप या आमदारांकडून होतोय.
आनंदाची बातमी! विहरीसाठी शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान
एकनाथ शिंदे भूखंड विषय, सीमावाद यांसारख्या विषयांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आतापर्यंत आक्रमक भूमिका घेतली नाही. मुळात आक्रमक भूमिकेमुळे आणि स्पष्ट बोलण्याने प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांचे असे शांत राहणे विरोधी पक्षातील आमदारांच्या पचनी पडत नाहीय.
साईबाबांच्या दर्शनाला जाताना आता मास्क वापरणे सक्तीचे: साई संस्थानचं आवाहन