Ajit Pawar । पक्षावर दावा सांगण्यासाठी अजित पवार उतरले मैदानात, पदाधिकाऱ्यांना दिलं प्रतिज्ञापत्राचं टार्गेट

Ajit Pawar came to the field to stake claim on the party, gave target of affidavit to office bearers

Ajit Pawar । मुंबई : २ जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप घडवून आणला. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांनी अचानक आपल्या ८ सहकाऱ्यांनी अचानक मंत्रिपदाची शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. इतकेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही (NCP) दावा केला. त्यासोबत शरद पवार (Sharad Pawar) गटानेही पक्षावर दावा केला आहे. (Latest Marathi News)

Crime News । माणुसकीच्या नात्याला काळिमा! iPhone खरेदी करण्यासाठी आई-वडिलांनी विकले 8 महिन्याच्या चिमुकल्याला

याबाबत अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) याचिका दाखल केली आहे. नुकतेच त्यावर आयोगाने शरद पवारांच्या गटाला नोटीस बजावून आपले मत मांडण्यास सांगितलं आहे. अशातच आता अजित पवार यांनी देखील हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी अजित पवारांनी आमदारांनी 10 हजार तसेच जिल्हाध्यक्षांना 5 हजार प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे टार्गेट दिले आहे.

Pune Crime News । पुण्यात एनआयएची माेठी कारवाई! तरुणांना भडकावणाऱ्या इसिस संबंधित डाॅक्टरला ठोकल्या बेड्या

दरम्यान, या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले नाही. परंतु तरीही देखील अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटात संघर्ष सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यावर अजित पवार गटाने भर दिला आहे. यावर आता शरद पवार गट कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar । देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा प्रयत्न नाही ना? रोहित पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

हे ही पहा

Spread the love