Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar Candidate l सर्वात मोठी बातमी! थोड्याच वेळात अजितदादा गटाची यादी जाहीर होणार; या नेत्यांना मिळणार संधी

Ajit Pawar

Ajit Pawar Candidate l महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अत्यंत तापले आहे. आगामी 20 नोव्हेंबर 2024 ला 288 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. अशा स्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट यांची पहिली उमेदवार यादी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर होणार आहे. या यादीत विद्यमान आमदारांची नावे असण्याची शक्यता आहे.

Devendr Fadanvis । विधानसभा निवडणुकांपूर्वी फडणवीसांना सर्वात मोठा धक्का! बडा नेता पक्षाची साथ सोडणार

अजित पवार गटाच्या या यादीत 32 ते 35 उमेदवारांची निवडक नावे असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता या यादीत कोणकोणत्या उमेदवारांना संधी मिळेल आणि कोणकोणत्या दिग्गजांचा पत्ता कट होईल, याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

यादी जाहीर होण्यापूर्वीच, पवार गटाने उमेदवार निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॉर्म वाटप केले आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर या आमदारांना बोलवण्यात आले होते. यामध्ये संजय बनोसेडे, चेतन तुपे आणि राजेश विटेकर यांसारखे नेते उपस्थित होते.

Pune News । पुणे पोलिसांची कडक कारवाई: 200 गाड्या 6 महिन्यांसाठी जप्त!

यावेळी वडगाव-शेरीचे आमदार सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतर नेत्यांना देखील एबी फॉर्म वितरित करण्यात आले. यामुळे यादीतील उमेदवारांच्या निवडीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

आजची यादी जाहीर होताच, राज्यातील राजकीय वातावरण आणखी चांगलेच तापणार आहे, कारण यामध्ये काही प्रमुख दिग्गजांची नावे आणि त्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

Shivsena Thackeray । शिरूरमध्ये शिवसेना-ठाकरेंना मोठा धक्का! बड्या नेत्याचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश

Spread the love
Exit mobile version