
Ajit Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे पालकमंत्री पद हे अजित पवार यांना देण्यात आले आहे. त्यामुळे भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
चंद्रकांत पाटलांकडे कोणते पद?
चंद्रकांत पाटील यांचे पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद जाईल असं वाटत होतं. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
12 जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढील प्रमाणे-
पुणे- अजित पवार
सोलापूर- चंद्रकांत पाटील
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
भंडारा- विजयकुमार गावित
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील