Ajit Pawar । पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) खूप मोठी फूट पाडली. यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) एकच खळबळ उडाली आहे. पक्षाचे दोन गट पडले आहेत. पक्षाचा एक गट म्हणजे अजित पवार गट महायुतीत सामील झाला असून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इतकेच नाही तर त्यांनी पक्षावर दावा देखील दाखल केला आहे. याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येईल. (Latest Marathi News)
Curative Petition । मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने घेतला सर्वात मोठा निर्णय
अशातच आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (Nationalist Congress Party) आपला दावा केला आहे. त्यांनी आज भिडेवाडा आणि फुलेवाड्याची पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अजित पवार गटाची बैठक झाल्याचं पत्रकारानं म्हणताच त्यांनी “आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही सांगू तेच खरं”, असं म्हणत राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा सांगितला आहे.
दरम्यान, त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची? असा सवाल अजूनही सर्वांच्या मनात आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) अजूनही याबाबत कोणताही निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी कोणत्या गटाची हे निश्चित होईल. त्यामुळे सर्वांचे निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
Accident News । दुर्दैवी! एकाच दिवशी चार भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू