पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे ( Assembly Elections) वारे जोरदार वाहत आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे भाजप तर दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये तर प्रचारादरम्यान चांगलीच चढाओढ लागली आहे. या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अनेक दिग्गज नेते सभा घेत आहेत. दरम्यान, काल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी एमपीएससीबाबत केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा उल्लेख निवडणूक आयोग म्हणून केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले होते. दरम्यान या विधानावरून अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
कसबा, चिंचवडमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस; शेवटच्या दिवशी दिग्गज नेते मैदानात
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “एकीकडे एमपीएससीचे मुलं उपोषणाला बसत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना सांगतात की निवडणूक आयोगाला आम्ही सांगू. सारखं निवडणूक आयोग… निवडणूक आयोग, त्या निवडणूक आयोगाने यांचं काम केलं तर तिकडेच त्यांची मिळती जुळती सुरू आहे, असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा, तरुणांनी पैशाची उधळण करताच पोलिसांनी केला लाठीचार्ज