अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका; म्हणाले, “आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात…”

Ajit Pawar criticizes Shinde-Fadnavis government; Said, "Unemployment today is massive..."

पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Assembly Elections) वारे जोरदार वाहत आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे भाजप तर दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये तर प्रचारादरम्यान चांगलीच चढाओढ लागली आहे. या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अनेक दिग्गज नेते सभा घेत आहेत. दरम्यान, काल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला.

एमसीस्टॅन होता वाईट संगतीत! मात्र आईवडिलांनी घेतला ‘हा’ निर्णय आणि बदलले आयुष्य

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चाकणमध्ये एक मोठा प्रकल्प येणार होता. यामुळे जवळपास दीड ते दोन लाख मुलं कामाला लागली असती. मात्र, तो प्रकल्प देखील गुजरातला गेला. यावेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय करत होते? अशी जहरी टीका अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

कसबा चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावले ‘हे’ आदेश; वाचा सविस्तर

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा उल्लेख निवडणूक आयोग म्हणून केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले होते. दरम्यान या विधानावरून देखील अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

धक्कादायक! रेल्वे रुळावर रिल्स बनवताना दोन तरुणांचा मृत्यू

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “एकीकडे एमपीएससीचे मुलं उपोषणाला बसत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना सांगतात की निवडणूक आयोगाला आम्ही सांगू. सारखं निवडणूक आयोग… निवडणूक आयोग, त्या निवडणूक आयोगाने यांचं काम केलं तर तिकडेच त्यांची मिळती जुळती सुरू आहे, असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

रानबाजार’मध्ये गुटखा खाण्याबद्दल प्राजक्ता माळीने केलं मोठं विधान; म्हणाली, “आत असलेला माल…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *