Ajit Pawar Dengue । अजित पवार यांना डेंग्यूची (Ajit Pawar Infected Dengue) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मागच्या दोन दिवसापासून अजित पवार सामाजिक कार्यक्रमा गैरहजर होते त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु होत्या. मात्र या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या सट्टा प्रसारमाध्यमांच्या बातम्यांच्या विरोधात, मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
Contrary to speculative media reports suggesting that Shri Ajit Pawar is not attending public events, I would like to clarify that he has been diagnosed with dengue since yesterday and has been advised medical guidance and rest for the next few days. Shri Ajit Pawar remains…
— Praful Patel (@praful_patel) October 29, 2023
Voter ID | आता घरच्याघरी ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र बनवा! जाणून घ्या प्रक्रिया
त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, श्री.अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की,आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील” असे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.