Ajit Pawar । भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, बड्या नेत्यांना सुनावलं; नेमकं काय घडलं?

ajit pawar

Ajit Pawar । सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. काल बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले आहे. यानंतर अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घोडेगाव या ठिकाणी सभा घेतली आहे.

Chicken Shawarma in Mumbai । धक्कादायक बातमी! चिकन शोरमा खाल्ल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

या सभेमध्ये अजित पवार हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांची एकापाठोपाठ भाषण सुरूच होती. यावरून अजितदादा संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या भाषणाची वेळ आली होती. यावेळी अजित पवार संतापून म्हणाले, ‘ मला दिवसभर सभा घ्यायच्या आहेत. हे काय सुरु आहे? हे बरोबर नाही.’ असं अजित पवार यांनी म्हटलं.

Sharad Pawar । राजकारणातील मोठी बातमी समोर; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ

अजित पवार संतापल्यानंतर सर्व भाषण थांबवत शिवाजीराव आढळराव पाटील हे स्वत: भाषणासाठी उभे राहिले. त्यानंतर ज्यांना भाषणाची संधी मिळाली नाही त्यांची त्यांनी माफी देखील मागितली.

Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदानाची ताजी आकडेवारी, जाणून घ्या बारामतीची स्थिती?

Spread the love