नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यामुळे भाजपने अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून भाजपच्या विविध नेत्यांनी त्यांना धारेवर धरल.
आश्चर्यकारक! ‘या’ गावातील लोक अजूनही मोबाईल न वापरता राहतात
त्यांच्या या वक्तव्यावरून सर्व स्तरातून टीका करण्यात आली. तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील विरोधक करत आहेत. आता या सर्वांनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद परिषद घेतली. यावेळी अजित पवारांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “संभाजीमहाराज हे धर्मवीर नव्हते, तसेच मी माफी मागणार नाही मी काहीही चुकीचं वक्तव्य केलं नाही”.
ईशान किशन ‘तो’ झेल आणि स्टेडियम मध्ये जल्लोष सुरू; फिल्डिंग कोच यांनी देखील केले कौतुक
आता अजित पवारांनी पुन्हा केलेल्या या वक्तव्यामुळे भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे म्हणाले, तुमची छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलण्याची लायकी नाही. आणि तुम्हाला इतिहास माहिती नसेल तर बोलू नका, अस निलेश राणे म्हणालेत. त्याचबरोबर पवार कुटुंब हे नेहमी छत्रपती घराण्याच्याविरोधात राहिले आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.