अजित पवारांची ( Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची इच्छा आजतागायत लपून राहिलेली नाही. अनेकदा त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न देखील केले आहेत. मागील काही दिवसांत राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा रंगल्या होत्या. विरोधी पक्षनेते अजित पवार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करतील व मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सर्वत्र सुरू होत्या. मात्र अजित पवारांनी स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला.
Riya Chakravarti: रिया चक्रवर्ती बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा वाचाच
दरम्यान, अगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आलीच तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद असणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. राज्यात राजकीय भूकंप होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार बंडखोरी करतील असेही म्हंटले जात आहे. या शक्यता अजित पवारांनी फेटाळल्या असल्या तरी चर्चा अजून कायम आहे. अशात महाविकास आघाडी तुटू नये. यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. ( Chief Minister in २०२४)
Ajit Pawar: बारसू रिफायनरीबाबत अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे लोक विरोध करत…”
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेससमोर एक प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्रात अगामी काळात सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद सोपावण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली आहे. एवढंच नाही तर अजित पवार मुख्यमंत्री असले तरी आपल्याला काही हरकत नाही. असे ठाकरेंनी सांगितले आहे. परंतु, यावर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका अजूनही मांडलेली नाही.
“आम्हाला पैसे नको जमिनी द्या…” रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध!