राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याच्या चर्चा चालू होत्या. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. अजित पवार हे पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याचे अनेकांनी ट्विटही केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु होत्या.
धक्कादायक! भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी
यांनतर तब्बल 17 तासानंतर अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमाला त्यांच्या पत्नीसह उपस्थित राहिले. पुणे येथील खराडी या ठिकाणी एका ज्वेलर्सच्या उद्टघाटनासाठी अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होते. यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता यावर अजित पवारांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
अजित पवार म्हणाले, “तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेऊन मी घरी आराम करत होतो,” असं ते म्हणाले. त्याचबरोबर ते म्हणाले “माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे मी ठीक झालो आहे,” असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. तसंच “माध्यमांनी विनाकारण बदानामी करणं थांबवावं” असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
ब्रेकिंग! नॉट रिचेबल अजित पवार पोहचले थेट पुण्यात; 17 तास नेमके कुठं होते?