गेली 30 वर्ष पुण्यावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणजे गिरीश बापट. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट. यांनी वयाच्या 73 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्त आणि सुरक्षारक्षकांनमध्ये हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
गिरीश बापट यांना जाऊन तीन दिवस उलटले नाही तोच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात बॅनर लावले आहे. भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. आता या बॅनरवरून अजित पवार यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
“…तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या” सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “गिरीश बापट यांच्या निधनाला फक्त तीन दिवस झाले आहेत. त्यांच्या अस्थिचे विसर्जन देखील अजून झाले नाही. थोडी माणुसकी राहुद्या, गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, आपल्यामध्ये १५ दिवस दुखवटा पाळण्याची पद्धत आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचे तारतम्य ठेवावे असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
सावधान! दिल्लीमध्ये डास मारण्याच्या कॉईलमुळे गेला कुटुंबातील सहा जणांचा जीव