Ajit Pawar Facebook Hack । धक्कादायक! अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक; फेक न्यूज पसरवण्याचा प्रयत्न

Ajit Pawar

Ajit Pawar Facebook Hack । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह मजकूर असलेले एक पेज फॉलो करण्यात आले, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या समर्थकांनी दावा केला आहे की हे पेज हॅक झाले आहे. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करण्याची योजना बनवली असून, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

One Nation One Election । आमदार, खासदार एकाचवेळी निवडता येणार? मोदी सरकारने ‘वन नेशन-वन इलेक्शन’ प्रस्तावाला दिली मंजूरी

याबाबत आमदार शिवाजीराव गर्जे यांनीही प्रतिक्रिया देत, पवार यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात विशेषतः पगलेट क्वीन नावाच्या पेजवर अडल्ट कंटेंट असल्याचे सांगितले जात आहे, जे अजित पवार यांच्या पेजवरून फॉलो करण्यात आले.

Pune Crime । पिंपरी चिंचवडमध्ये गणेशोत्सवादरम्यान खून आणि गोळीबाराच्या घटनांनी खळबळ!

यापूर्वी पवार यांच्या पेजवर फॉलो करणाऱ्यांमध्ये पार्थ अजित पवार, एनसी स्पीक्स, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचा समावेश होता. अचानक या पेजचे फॉलोवर येण्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांच्या सोशल मीडिया टीममध्येच या गोष्टीमागे काही व्यक्तींचा हात आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

Manoj Jarange Patil । ‘जरांगेंना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही तर…’, बड्या नेत्याच्या धक्कादायक आरोपाने उडाली खळबळ

शिवाजीराव गर्जे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत, मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक चॅनल्सवर याबाबत कोणतीही खात्री न करता खोटी माहिती पसरवणे खेदजनक असल्याचे म्हटले. त्यांनी संबंधितांना कायदेशीर कारवाईसाठी सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल करण्याची सूचना दिली आहे. अजित पवार यांचे पेज हॅक होणे आणि फेक न्यूज पसरवणे, या दोन्ही गोष्टींचा चौकशीसाठी योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Sameer Khan Accident । सर्वात मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात

Spread the love