Ajit Pawar । महायुतीत पडणार दरार? विदर्भात अजित पवार गटाची भाजपच्या 3 जागांवर नजर

Ajit Pawar

Ajit Pawar । अवघ्या काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) फूट पडून या पक्षांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणूक अटीतटीची होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Mahadev Betting App । मोठी बातमी! महादेव बेटिंग अ‍ॅपसंबंधी मुंबई क्राईम ब्रँचकडून पहिली अटक

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Faction) विदर्भातील 10 पैकी 3 जागेवर दावा केला आहे. परंतु भंडारा-गोंदिया, गडचिरोली,वर्धा जिल्हा या तिन्ही जागेवर भाजपचे खासदार आहेत. पवार गटाच्या दाव्यामुळे महायुतीसमोर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Sharad Mohol । सहा महिन्यांसाठी तडीपार.. मुळशीतील सरपंचाच अपहरण…, शरद मोहोळबद्दल ‘या’ धक्कादायक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

जागावाटप हा सर्वच पक्षांसमोरचा कळीचा मुद्दा असेल. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जागावाटपाचा सुत्र अजूनही निश्चित करण्यात आलेले नाही. यादरम्यान विदर्भातील तीन जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

WTC 2025 । भारतीय संघाला मोठा झटका! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल

Spread the love