नोव्हेंबर 2019 मधला ‘तो’ पहाटेचा शपथविधी! त्या शपथविधीने राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ. त्यानंतर भाजपला बसलेला धक्का आणि महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दरम्यान ‘तो’ पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
बळीराजा चिंतेत! कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाल्याने कलिंगड शेतातच पडून
तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान केले आहे. 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार अवघ्या 72 तासांत कोसळले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कधीच स्पष्ट वक्तव्य केले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यावर आता स्पष्ट बोलले आहेत. यांनतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र या शपथविधीवर अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा! राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती
यामध्येच आता पुण्यात एका कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांकडे येणं टाळलं. दरम्यान, पहाटेच्या शपथविधीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यावेळीस ही घटना त्यावेळीस मी सर्वाना सांगितल आहे यावर मी बोलणार नाही. मग तुम्ही मला सारखं सारखं हे का विचारता? असा सवाल अजित पवार यांनी संतप्त होऊन माध्यमांना उपस्थित केला आहे.