Ajit Pawar । शरद मोहोळ हत्या प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Ajit Pawar

Ajit Pawar । पुणे : काल पुणे शहरामध्ये भर दिवसा रक्तरंजित थरार घडला आहे. कारण पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये कुख्यात गुंड शरद मोहळचा (Sharad Mohal) गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. गोळ्या झाल्यानंतर शरद मोहोळ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने पुणे शहर चांगलेच हादरले आहे. (Sharad Mohal Murder Update)

Anganvadi Strike। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावर तोडगा निघेना, नऊ हजार कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “पुणे शहरात काल एक घटना घडली होती. (Sharad Mohal Murder) पोलिसांनी तातडीने दोषींपैकी अनेकांना पकडलं आहे. या प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय, संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मी या प्रकरणाबद्दल बोलणं उचित नाही, पण मी इतकेच तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या संदर्भात जी काही वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर आणली जाईल,” असे अजित पवार म्हणाले आहेत. (Latest marathi news)

Rohit Pawar । बारामती अ‍ॅग्रो कारवाईनंतर रोहित पवारांची पत्रकार परिषद, अजित पवारांवर साधला निशाणा

पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने माझं शहरावर सतत लक्ष असतं. मी राज्यासाठी तर काम करतच असतो, ती आमची जबाबदारी असते. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर विकासाबाबतीत मागे राहू नये, म्हणून प्रयत्न सुरु असतात. निगडीपर्यंत मेट्रोचं स्टेशन मंजूर झालं आहे. तसेच शिवाजीनगरला सेशन कोर्टजवळ मेट्रोचं जंक्शन असेल”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

Ajit Pawar । महायुतीत पडणार दरार? विदर्भात अजित पवार गटाची भाजपच्या 3 जागांवर नजर

Spread the love