तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी असल्याने भाविक देवदर्शनासाठी जातात. भाविकांना दर्शनासाठी तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी काही ड्रेसकोड देण्यात आला होता. या ठिकाणी शॉर्ट कडपे परिधान करणाऱ्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यानंतर काही तासातच तुळजाभवानी मंदीर संस्थेनं हा निर्णय मागे घेतला. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! मंत्रिपदासाठी राजकीय वर्तुळात रंगली या’12 नावांची चर्चा!
मंदिराच्या या नियमावलीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, कोणत्या देवानं सांगितलं की हाफ पँट घालून देर्शन घेऊ नये, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. ते माध्यमांशी बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पेरणीआधी सरकार १० हजार रुपये देण्याच्या तयारीत? कृषिमंत्र्यांचे वक्तव्य
त्याचबरोबर बोलताना ते पुढे म्हणाले, दहावीपर्यंत आम्ही शाळेत हाफ पँट घालून जायचो कारण त्यावेळी घरचे आम्हाला सांगायचे की अकरावीला गेल्यावर तुम्हाला फुल पॅन्ट मिळेल. ही अशी पद्धत ग्रामीण भागात होती. मुलं हाफ पँट घालून आली म्हणून दर्शन घेऊन द्यायचं नाही हे असं कोणीसांगितलं? कोणत्या देवानं सांगितलंय? काही जण याचा विपर्यास करत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी म्हंटले आहे.
काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्यांसह निवृत्त IAS, IPS यांचा भाजपमध्ये प्रवेश