राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अर्थसंकल्प हा आयपॅडमधून वाचला आहे. आता फडणवीसांच्या या बजेटवर अजित पवारांनी जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात फडणवीसांनी केल्या ‘या’ १० महत्वाच्या घोषणा; वाचा एका क्लिकवर
विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी टीका करत म्हणाले, अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असल्याची टीका पवारांनी यावेळी केली आहे. त्याचबरोबर बजेटच्या एक एक मुद्द्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना म्हणाले, अर्थसंकल्पामुळे आमचा भ्रमनिरास झाला, यामधून निव्वळ घोषणाबाजी झाली, राज्य अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्याची हमी, पण भरीव म्हणजे किती याची कोणतीच स्पष्टता नाही. अशी जोरदार टीका यावेळी अजित पवार यांनी केली आहे. राज्याची परिस्थिती काय आहे. राज्याचं उत्पन्न किती, खर्च किती याचा कोणीच विचार केलेला दिसत नाहीये. असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी नेमका कुणाला डोळा मारला? सोशल मीडियावर होतेय ‘त्या’ व्हिडिओची जोरदार चर्चा