रासायनिक खतं खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर राज्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. यामध्येच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या, “हे सरकार…”
अधिवेधनामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा गाजत असताना आता वेगळाच वाद सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. आता शेतकऱ्याला खत खरेदी करताना जात विचारली या प्रकरणाचा महाविकास आघाडीनं जोरदार निषेध केला आहे. ‘अहो, शेतकरी हीच आमची जात आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय, असा सवाल यावेळी अजित पवार यांनी केला आहे.
“बिबट्या घुसला थेट घरात अन्…”, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित केला. आणि सरकारला या मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले आहे. त्याचबरोबर जातीचं लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
धक्कादायक! अवकाळी पावसामुळे शेतात गव्हाचे पीक पडले आडवे; चिंताग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या