Ajit Pawar group । अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना, त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी विरोध केला होता. 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. ते शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव शरद पवार यांच्याकडे पाठवले.
MLA P. N. Patil । सर्वात मोठी बातमी! आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, उमेश पाटील म्हणाले, “शरद पवारांनी 2019 मध्ये जाणीवपूर्वक ही परिस्थिती निर्माण केली कारण त्यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणार होती.” पण रश्मी ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे होते पण शरद पवारांनी नकार दिला. त्यानंतर शिवसेनेकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद तर सुप्रिया सुळे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील असं ठरले होते.
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आले. शरद पवार यांच्याकडे पर्याय नव्हता त्यामुळे त्यांना अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले कारण सर्व आमदार अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी करत होते.