Maharashtra politics । अजित पवार गटाला मोठा धक्का! 137 जणांनी दिला तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

Maharashtra politics

Maharashtra politics । पुणे : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. त्यापूर्वी अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम त्यांना आगामी निवडणुकीत पाहायला मिळू शकतो. (Latest marathi news)

Fire News । काही क्षणांत झालं होत्याच नव्हतं! 7 मजली इमारतीला भीषण आग लागून 44 जणांचा मृत्यू तर 22 जण जखमी

लोणावळ्यात अजित पवार गटात नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. लोणवळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार गटात) राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह तब्बल 137 जणांनी राजीनामा दिला असून त्यांच्या या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

LPG Price । सर्वसामान्यांना सरकारचा मोठा धक्का! एलपीजी सिलिंडरमध्ये झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

दरम्यान, ही नाराजी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी हस्तक्षेप केल्याने व्यक्त करण्यात आली आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. पण या आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिल्याने पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

Politics News । ब्रेकिंग! महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; पाहा कोणाला किती जागा मिळाल्या?

Spread the love